Unlock1.0: Center issues new rules; New rules from June 08 coronavirus update  
देश

Unlock1.0 : केंद्राची नवी नियमावली जारी; ०८ जूनपासून नवे नियम

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात 2 महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी कडक टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, टाळेबंदीच्या पाचव्या पर्वात मोठी सूट दिली जात आहे. केंद्राने अनलॅाक-1 ची नियमावली जारी केली आहे. 8 जूनपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यानुसार केंद्र सरकारने रेस्टॉरंट, मॉल, हॉटेल आणि धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी काही नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

- धार्मिक स्थळांना भेट देण्यापासून 65 वर्षांपुढील व्यक्ती आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना रोख लावण्यात आली. तसेच मंदिरात कोणत्याही वस्तूंना स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे.  मंदिरात प्रसाद वाटता येणार नाही. भजन किर्तन करता येणार नाही. तसेच धार्मिक स्थळी थर्मल स्क्रीनिंग करणं आवश्यक असणार आहे. तसेच मास्क घालणे बंधनकारक आहे. धार्मिक स्थळांना वेळोवेळी सॅनिटाइज करावं लागणार आहे.
----------
पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न
-----------
- जर कार्यालयात covid-19 चे एक किंवा दोन रुग्ण सापडले, तर पूर्ण कार्यालय बंद करण्याची आवश्यकता नाही. कार्यालयाला विषाणू मुक्त करुन काम पुन्हा सुरु केले जाऊ शकते. प्रत्येक कार्यालयात सॅनिटायझर मशिन असणे आवश्यक आहे. तसेच तापमान मोजणारी मशीन कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी असणं बंधनकारक असणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने मास्क वापरणे गरजेचं आहे. एखादा कर्मचारी कंटेंमेंट झोनमध्ये राहत असले तर त्याला घरुन काम करण्याची परवानगी मिळणार आहे. 

- हॉटेलमध्ये राहायला आलेल्या ग्राहकाने स्वत:चा मेडिकल इतिहास आणि प्रवास इतिहासाची माहिती देणे आवश्यक असणार आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवावा लागणार आहे. हॉटेल वातानुकूलीत असल्यास नियमानुसार तापमान 24 ते 30 डिग्रीमध्ये ठेवावं लागणार आहे. तसेच आतमध्ये 40 ते 70 आद्रता राहिल याची काळजी हॉटेल मालकांना घ्यावी लागणार आहे.

- खाद्यपदार्थाची पोचती करणाऱ्या व्यक्तीला पार्सल हातात देणं टाळावं लागणार आहे. त्याऐवजी पार्सल दरवाजासमोर किंवा इतर ठिकाणी ठेवावी लागणार आहे.

-रेस्टॉरंटमध्ये एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांना प्रवेश देणे आवश्यक आहे. तसेच आसनव्यवस्था दूर असणे गरजेचं आहे. ग्राहक उठून गेल्यानंतर तो ज्या ठिकाणी बसला होता, ती जागा सॅनिटाइज करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

Shani Dosha: शनि दोष कमी होईल; फक्त हनुमान मंदिरात गेल्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा!

SCROLL FOR NEXT